
लातूर : लातूर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन व महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने उदगीर येथे ९ फेब्रुवारी रोजी लातूर जिल्हा सब ज्युनियर अॅथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
उदगिरी महाविद्यालयाच्या क्रीडांगमावर ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता जिल्हास्तरीय सब ज्युनिअर ॲथलेटिक्स स्पर्धा सुरू होईल. ही स्पर्धा ८, १०, १२, १४ वर्षांखालील मुले व मुली या वयोगटाप्रमाणे घेण्यात येणार आहे. स्पर्धेतील सर्व विजेत्या खेळाडूंना मेडल्स व विशेष प्राविण्य प्रमाणपत्र दिले जाणार आहेत. तसेच या स्पर्धेतून लातूर जिल्हाचा संघची निवडला केली जाईल.
निवड झालेल्या खेळाडूंना पंढरपूर येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत सहभाग घेता येणार आहे. खेळाडूंनी स्पर्धेस येताना क्रीडा प्रकार शुल्क, जन्म तारखेचा दाखला घेऊन उपस्थित राहण्याचे आवाहन संघटनेचे सचिव ॲड विक्रम संकाये, सहसचिव निजाम शेख, कार्याध्यक्ष प्रा व्ही आर हुडगे, प्रा सतीश मुंढे, प्रा सचिन चामले यांनी केले आहे.