
खोपोली येथे ८, ९ फेब्रुवारी रोजी आयोजन
पुणे : एन्ड्युरन्स इंडियातर्फे खोपोली येथे ८ व ९ फेब्रुवारी रोजी एन्ड्युरन्स नॅशनल चॅम्पियनशिप आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती एन्ड्युरन्स इंडियाचे अध्यक्ष योगेश कोरे यांनी दिली.
खोपोली येथील याक पब्लिक स्कूल येथे एन्ड्युरन्स नॅशनल चॅम्पियनशिप दोन दिवस रंगणार आहे. या स्पर्धेत सातशेहून अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत. तसेच महाराष्ट्रासह छत्तीसगड, कर्नाटक, तेलंगणा, मध्य प्रदेश, तामिळनाडू, केरळ, गुजरात, आंध्र प्रदेश आणि हिमाचल प्रदेश या राज्यांचा सहभाग असणार आहे. १४० प्रशिक्षक, २५ अधिकारी, १५ आयोजन संघ, अधिकृत परीक्षा उमेदवार ३० अशा सगळ्यांचा सहभाग असणार असल्याची माहिती अध्यक्ष योगेश कोरे यांनी दिली. या स्पर्धेचे यूट्यूब चॅनलवर प्रक्षेपण करण्यात येणार आहे. या स्पर्धेचे मीडिया पार्टनर म्हणून स्पोर्ट्स प्लस हे काम पाहणार आहे.