
नाशिक : धुळे येथे आयोजित करण्यात आलेल्या १९ वर्षांखालील मुला-मुलींच्या आंतर शालेय टेनिस क्रिकेट स्पर्धेत पुणे विभाग आणि अमरावती विभाग या संघांनी विजेतेपद पटकावले.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय धुळे, जिल्हा क्रीडा परीषद धुळे, टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र आणि टेनिस क्रिकेट असोसिएशन धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १९ वर्षांखालील मुले व मुली शालेय टेनिस क्रिकेट स्पर्धा धुळे येथे पार पडली. स्पर्धेत मुलांच्या गटात ७ विभागांनी तर मुलींच्या गटात ४ विभागातील संघांनी सहभाग घेतला होता.

या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी धुळे टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष संतोष खताळ, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे, क्रीडा अधिकारी एम के पाटील, टेनिस क्रिकेट इंडियाच्या महासचिव मीनाक्षी गिरी, विलास गिरी, धनश्री गिरी, संदीप शिंदे, संदीप पाटील, दर्शन थोरात, सोमा बिराजदार, मानस पाटील, श्रीनाथ कारकर, अर्जुन वाघमारे, धनंजय लोखंडे आदी उपस्थित होते. जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. या वेळी मैदानावर मीनाक्षी गिरी, एम के पाटील हे उपस्थित होते.
पारितोषिक वितरण
माजी आमदार शरद पाटील, सुनील पाटील, निंबा नाना मराठे, विनोद जगताप, अविनाश टिळे, मीनाक्षी गिरी यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. शरद पाटील यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन करुन मार्गदर्शन केले.
धुळे जिल्हा सचिव संदीप शिंदे यांनी आभार मानले.
अंतिम निकाल
मुलांचा गट : १. पुणे विभाग, २. नागपूर विभाग, ३. मुंबई विभाग.
मुलींचा गट : १. अमरावती विभाग, २. पुणे विभाग, ३. मुंबई विभाग.