
छत्रपती संभाजीनगर : ३०व्या ज्युनियर राज्यस्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेत कोल्हापूर आणि जळगाव संघाने विजेतेपद पटकावले.
महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल असोसिएशन अंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्हा सॉफ्टबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय क्रीडा संकुल येथे ज्युनियर राज्यस्तरीय मुला-मुलींची सॉफ्टबॉल स्पर्धा संपन्न झाली. मुलांच्या गटात कोल्हापूर संघाने विजेतेपद पटकावले. नाशिक संघ उपविजेता ठरला. जळगाव आणि अमरावती जिल्हा संघाने तृतीय स्थान विभागून मिळवले. मुलींच्या गटात जळगाव संघाने विजेतेपद पटकावले. सांगली संघाने उपविजेतेपद मिळवले. कोल्हापूर संघाने तृतीय पदक प्राप्त केले.

पारितोषिक वितरण या स्पर्धेतील विजेत्यांना प्रमुख अतिथी शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त शिरीष बोराळकर, राज्य रस्सीखेच संघटनेचे सचिव जनार्दन गुपिले यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, क्रीडा अधिकारी खंडूराव यादव, सुरेंद्र मोदी, विनोद माने, परभणीचे प्रसेंनजीत बनसोडे, सांगलीचे अभय बिराज, किशोर चौधरी, छत्रपती संभाजीनगर जिल्हा संघटना सचिव गोकुळ तांदळे, संदीप लंबे, मदने, संतोष साळुंखे, गणेश बेटूदे आदी मान्यवर उपस्थित होते.
अंतिम सामन्यात मुख्य पंच म्हणून अक्षय येवले, विकास वानखेडे, कल्पेश कोल्हे, मयुरेश औसेकर, सुशील मधवाटे, वैभव बारी, रोहित तुपारे, प्रवीण गडाख, सुयोग कल्पेकर, भीमा मोरे, सचिन बोर्डे, शिवाजी पाटील यांनी काम पाहिले. गुणलेखक म्हणून मयुरी चव्हाण व ईश्वरी शिंदे आदींनी काम पाहिले.
या स्पर्धेत ओमकार धातबाले, बंटी राठोड (नाशिक), ऋतुजा पवार, श्रेया पवार, अनुष्का सावंत (सांगली), अनुज मिरजकर, केदार जाधव, दक्षता कामेरे, वैष्णवी जाधव (कोल्हापूर) या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी प्रवीण शिंदे, रफिक जमादार, राकेश खैरनार, यश थोरात, निखिल वाघमारे, गणेश जहारवाल, विशाल जहारवाल तसेच जिल्हा सॉफ्टबॉल बेसबॉल अकॅडमीच्या खेळाडूंनी परिश्रम घेतले.