
राज्यभरातून ४५ संघाचा सहभाग
नंदुरबार (मयुर ठाकरे) : महाराष्ट्र राज्य शुटींगबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने व नंदुरबार जिल्हा शुटींगबॉल असोसिएशन यांच्यावतीने आयोजित प्रेमदास कालू यांच्या स्मरणार्थ ३८ वी महाराष्ट्र राज्य शूटिंगबॉल अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत ४५ संघांचा सहभाग आहे.
१७ व १९ वर्ष वयोगटात ही स्पर्धा होत आहे. या स्पर्धेचे आयोजन एस. ए. मिशन हायस्कूलच्या क्रीडांगणावर करण्यात आले असून स्पर्धेचे उद्घाटन शुटींगबॉलचे माजी खेळाडू तथा पश्चिम खानदेश भिल्ल सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ सुहास नटावदकर यांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करून करण्यात आले.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य शुटींगबॉल असोसिएशनचे सचिव के आर ठाकरे, एस ए मिशन ट्रस्टचे सचिव डॉ राजेश वळवी, एस ए मिशन हायस्कूलच्या प्राचार्या नुतनवर्षा वळवी, टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष पुष्पेंद्र रघुवंशी, एस ए मिशन ट्रस्टचे उपाध्यक्ष हर्षानंद कालू, संचालक डॉ राजेश वसावे, नंदुरबार जिल्हा संघटनेचे अध्यक्ष मीनल कुमार वळवी, सचिव डॉ मयुर ठाकरे, छत्रपती पुरस्कार प्राप्त शुटींगबॉल खेळाडू अशोक चौधरी, क्रीडा शिक्षक भागुराव जाधव, अनिल रौंदळ, जगदीश वंजारी, भरत चौधरी, आशिष कडोसे आदी उपस्थित होते. स्पर्धेत राज्यभरातून ४५ संघ नंदुरबार शहरात दाखल झाले आहेत.
या स्पर्धेतून महाराष्ट्र राज्याचा सब ज्युनिअर व ज्युनिअर गटाचा महाराष्ट्राचा संघ निवडला जाणार आहे. यावेळी बोलताना डॉ सुहास नटावदकर यांनी खेळातून मिळालेल्या संधीचं मुलांनी सोनं करायला हवं. शालेय जीवनात खेळामुळे शिस्त अंगीकारावी.’
मिशन ट्रस्टने राज्यस्तरावरील स्पर्धेतून नंदुरबार जिल्ह्यात खेळाडूंना संधी उपलब्ध करून दिली. आज झालेल्या सामन्यांमध्ये सब ज्युनिअर गटात छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, सोलापूर, अमरावती, धुळे, परभणी, जळगाव हे संघ उपांत्य फेरीत दाखल झाले आहेत. स्पर्धा यशस्वीतेसाठी सतीश सदाराव, आकाश बोडरे, मनीष सनेर, तेजस्विनी चौधरी, रुपेश महाजन, मनीष पाटील, संतोष मराठे, राजेश्वर चौधरी, प्रा जितेंद्र माळी आदींनी परिश्रम घेतले.