
१८ सुवर्णपदकांची कमाई; साई बॉक्सिंग क्लब सांगवी उपविजेता
पुणे : भारतीय जैन संघटना वाघोली आणि पुणे शहर बॉक्सिंग संघटनेच्या मान्यतेने आयोजित पुणे जिल्हास्तरीय बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेमध्ये बळवंत सुर्वे बॉक्सिंग क्लब, पिंपरी या संघाने १८ सुवर्णपदके मिळवून सांघिक विजेतेपदाचा करंडक पटकावला. साई बॉक्सिंग क्लब सांगवी या संघाने ८ सुवर्णपदकांसह सांघिक उपविजेतेपद मिळविले.
अष्टविनायक मित्र मंडळ वाघोली आणि सूर्यकांत दूधभाते बॉक्सिंग क्लब यांच्या संयुक्त विद्यमानाने श्री विक्रम वाघमारे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या स्पर्धेमध्ये पुणे जिल्हा पुणे शहर व पिंपरी चिंचवड शहर संघटनेच्या २४७ खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता.
पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष नगरसेवक अविनाश बागवे यांच्या हस्ते अष्टविनायक मित्र मंडळाचे अध्यक्ष विक्रम वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. या प्रसंगी रामदास भाऊ दाभाडे, शांताराम बापू कटके, एन के निंबाळकर, अनिल सातव पाटील, केतन जाधव, जयश्रीताई सातव पाटील, राजेंद्र सातव पाटील, डॉ पवन सोनवणे, संदीप सातव पाटील, विजय जाचक, शिवछत्रपती पुरस्कार विजेते विजय यादव, पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे कार्याध्यक्ष भरतकुमार व्हावळ, पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचे कार्याध्यक्ष मदन वाणी, पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे सरचिटणीस अभिमन्यू सूर्यवंशी, खजिनदार सूर्यकांत दूधभाते, राष्ट्रीय बॉक्सर प्रवीण सातव, बळीराम जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचे उपाध्यक्ष सुरेशकुमार गायकवाड, अशोक मेमजादे, जीवनलाल निंदाने, आंतरराष्ट्रीय बॉक्सर
कॅप्टन तुक बहादुर थापा, संघटनेचे खजिनदार अमोल सोनवणे,
डॉ राहुल पाटील, मनोज यादव, रॉबर्ट दास, संजय यादव, संतोष यादव, प्रदीप वाघे, सुनील पाटील, सनी साळवे, विनोद कुंजीर, अमन शर्मा, कुणाल पालकर, मंगेश यादव आदींनी मोलाचे योगदान दिले. पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचे सचिव विजय गुजर यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले.
वैयक्तिक विशेष पारितोषिक
कब क्लास : बेस्ट बॉक्सर मुले : सौरभ धांडोरे (केएलव्हीएसपी, पुणे), बेस्ट बॉक्सर मुली : मानसी डेरे (वीरा अकॅडमी, फुरसुंगी).
कॅडेट क्लास : बेस्ट बॉक्सर मुले : अर्णव लोखंडे (साई बॉक्सिंग, सांगवी), बेस्ट बॉक्सर मुली : अरुशी खेत्रे (एनबीएफसी, मोशी), मोस्ट प्रॉमिसिंग बॉक्सर : स्वराज वाघमारे (एस डी बॉक्सिंग क्लब, शिरूर).
सब ज्युनियर गटॉ : बेस्ट बॉक्सर मुले : मानस पाटील (एसपीबीसी, आव्हाळवाडी), बेस्ट बॉक्सर मुली : आर्या सातव (एस डी बॉक्सिंग क्लब, शिरूर), मोस्ट प्रॉमिसिंग बॉक्सर मुले : समर्थ सोनवणे (एम आय जी एस, पुणे), मोस्ट प्रॉमिसिंग बॉक्सर मुली : साक्षी मीना ( स्टार बॉक्सिंग अकॅडमी, खडकी).
जुनिअर गट : बेस्ट बॉक्सर मुले : शौर्य शेवाले (पी सी एस एफ, पिंपरी), बेस्ट बॉक्सर मुली : नक्षत्रा अंगज (बी एस बी सी, पिंपरी), मोस्ट प्रोमोसिंग बॉक्सर : प्रणीत देवडीकर (एक्स सर्विसेस, पुणे), बेस्ट रेफ्री : मनोज डी. यादव (पिंपरी), बेस्ट जज : जीवनलाल निंदाणे (पुणे शहर), बेस्ट कोच : सुकन्या सुर्वे (बी एस बी सी, पिंपरी).