
डेहराडून : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या बॅडमिंटनपटूंनी आपली विजयी घोडदौड रविवारपासून सुरू केली. दर्शन पुजारी, कौशल धर्मामेर यांनी उपांत्यपूर्व फेरीत मजल मारली आहे.
परेड मैदानावरील हॉलमध्ये सुरू असलेल्या कोर्टवर पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत पुण्याच्या दर्शन पुजारीने राजस्थानच्या संस्कार सारस्वत याला २१-१८, २२-२४, २१-१६ गुणांनी पराभूत केले. कौशल धर्मामेर याने कर्नाटकच्या रघू एम याला १८-२१, २१-१३, २१-१२ गुणांनी हरवले. महिला एकेरीत आलिशा नाईकला पराभवाचा सामना करावा लागला.