नॅशनल गेम्स स्पर्धेसाठी माधव शेजुळ, गणेश माळवे, संजय भूमकर यांची निवड

  • By admin
  • February 3, 2025
  • 0
  • 35 Views
Spread the love

सेलू : भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन व उत्तराखंड राज्य सरकारच्या वतीने आयोजित ३८व्या नॅशनल गेम्स स्पर्धेसाठी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन व राज्य क्रीडा संघटनेच्या वतीने ॲथलेटिक्स क्रीडा प्रकारात संघ व्यवस्थापक म्हणून डॉ माधव शेजुळ, तर टेबल टेनिस क्रीडा स्पर्धेसाठी संघ व्यवस्थापक म्हणून गणेश माळवे तर तलवारबाजी क्रीडा स्पर्धेसाठी तांत्रिक समिती सदस्य म्हणून संजय भूमकर यांची निवड झाली आहे.

डॉ माधव शेजुळ हे परभणी येथे ज्ञानपोसक महाविद्यालयात कार्यरत आहेत. शेजुळ हे शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त असून ते ॲथलेटिक्स संघटनेचे कोषाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. तसेच विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले आहे.

गणेश माळवे हे सेलू येथील नूतन विद्यालयात क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. माळवे हे महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटनेच्या कार्यकारिणी सदस्य व परभणी जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे सचिव म्हणून काम पाहत आहेत.

नूतन विद्यालयात क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत असलेले संजय भूमकर हे एनआयएस तलवारबाजी प्रशिक्षक आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक राष्ट्रीय तलवारबाजी खेळाडूंना मार्गदर्शन लाभले आहे.

परभणी जिल्ह्यातील तिघांची निवड झाली आहे. या निवडीबद्दल महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन सरचिटणीस नामदेव शिरगावकर, सहसचिव प्रकाश तुळपुळे, ॲथलेटिक्स संघटनेचे सरचिटणीस सतीश उचील, टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष प्रवीण लुंकड, सरचिटणीस यतिन टिपणीस, तलवारबाजी संघटनेचे सरचिटणीस डॉ उदय डोंगरे, डॉ गणेशराव दुधगावकर, अप्पर जिल्हाधिकारी डॉ प्रताप काळे, डॉ एस एम लोया, डी के देशपांडे, डॉ व्ही के कोठेकर, जयप्रकाशजी बिहाणी, जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे, राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय मुंढे, रणजीत काकडे, पांडुरंग रणमाळ, मुख्याध्यापक संतोष पाटील, उपमुख्याध्यापक किरण देशपांडे रोहिदास मोगल, प्रशांत नाईक, विविध क्रीडा संघटना यांनी अभिनंदन करुन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *