
छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा लीगल अँड जनरल एज्युकेशन सोसायटीच्या डॉ इंदिराबाई भास्करराव पाठक कला महाविद्यालयातील शिखर कन्या अॅडव्हेंचर क्लब मार्फत मराठवाड्यातून चंदिगढ येथे सुरू असलेल्या ३१व्या राष्ट्रीय अॅडव्हेंचर फेस्टिवल महाराष्ट्र राज्यातून १३ गिर्यारोहक राज्याचे प्रतिनिधित्व करत आहेत.
या मोहिमेचा फ्लॅगऑफ मराठवाडा लीगल अँड जनरल एज्युकेशन सोसायटीचे माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ श्रीकिशन मोरे आणि डॉ इंदिराबाई भास्करराव पाठक कला महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ सुनीता बाजपाई यांच्या हस्ते गिर्यारोहकांना राष्ट्रध्वज सुपूर्त करून मोहिमेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
या मोहिमेचे नेतृत्व क्रीडा विभाग प्रमुख आणि एव्हरेस्टवीर डॉ मनीषा वाघमारे या करत आहेत. या प्रसंगी माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख डॉ सचिन देशमुख, शिखरकन्या अॅडव्हेंचर क्लबच्या सदस्य डॉ रमा दुधमांडे आदी उपस्थित होते.
या राष्ट्रीय अॅडव्हेंचर फेस्टिवल मध्ये महाराष्ट्र, तामिळनाडू, हरियाणा, पंजाब, ओडिशा, पश्चिम बंगाल, दिल्ली, मध्य प्रदेश, उत्तरप्रदेश, गोवा, आसाम, उत्तराखंड आदी राज्यातून एकूण ९१० गिर्यारोहक सहभागी झाले आहेत. या संघात महाविद्यालयातून खुशाली मधेकर, पूजा बागडे, साक्षी बागडे, कोमल बागडे, प्रा. अश्विनी शहाणे, अनुश्री देशमुख, अमृता देशमुख, रुद्रप्रसाद ढवळे (सिल्लोड), अनुप्रज्ञ बनकर (छत्रपती संभाजीनगर), पल्लवी धबाले (परभणी), विजय वाघमारे (नाशिक) अणि सोनिया दुधमांडे (पुणे) या गिर्यारोहकांचा समावेश आहे.
या राष्ट्रीय अॅडव्हेंचर फेस्टिवल मध्ये हिमाचल प्रदेशातील नारखंडा, मनाली, शिमला आणि उत्तराखंड या हिम प्रदेशांमध्ये रॉक क्लाइविंग, रॅपलिंग, कमांडो रॅपलिंग, माउंटेनिअरिंग, व्हाइट वॉटर राफ्टिंग, रिव्हर क्रॉसिंग, जुमारिंग, स्नो क्राफ्ट, ट्रेकिंग, स्कीइंग, पॅरासिलिंग, टेंट पिचिंग अशा विविध प्रकाराचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
मराठवाडा लीगल अँड जनरल एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा अॅड डॉ कल्पलता भारास्वाडकर पाटील तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व गिर्यारोहकांना मोहिमेसाठी शुभेच्छा दिल्या.