
छत्रपती संभाजीनगर : देहरादून येथे आयोजित ३८ व्या नॅशनल गेम्स नेटबॉल क्रीडा प्रकारासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा नेटबॉल संघटनेचे सचिव सतीश इंगळे यांची तांत्रिक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
सतीश इंगळे हे वरिष्ठ पंच असून नॅशनल गेम्ससाठी महाराष्ट्रातून एकमेव त्यांची निवड झाली आहे. याआधी त्यांची गुजरात व गोवा याठिकाणी आयोजित नॅशनल गेम्ससाठी आणि १३ व्या एशियन नेटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी तांत्रिक अधिकारी म्हणून निवड झालेली आहे. या अगोदर त्यांनी विविध राष्ट्रीय स्पर्धेत तांत्रिक अधिकारी,सलेक्टर, प्रशिक्षक म्हणून कार्य केले आहे.
या निवडीबद्दल राष्ट्रीय फेडरेशन अध्यक्ष सुमन कौशिक, सचिव विजेंद्र सिंग, चेअरमन हरिओम कौशिक, राज्य संघटनेचे अध्यक्ष बिपीनभाई कामदार, सचिव डॉ ललित जिवानी, कोषाध्यक्ष डॉ एस एन मुर्तीजी, श्याम देशमुख, जिल्हा संघटनेचे सुनील डावकर, धर्मेंद्र काळे, रमेश प्रधान, मनोज बनकर, दिलीप जाधव, आकाश सरदार, सचिन दांडगे, संकेत बोन्गार्गे, हर्षवर्धन मगरे, जयवर्धन इंगळे, वैष्णवी खरात, प्राची बागुल, मेघा पठारे, साक्षी जाधव, दीपाली काळे, आकांक्षा मगरे, किर्तीवर्धन मगरे, राजवर्धन मगरे, विक्रमसिंग कायटे, दीपाली प्रधान, नंदिनी बनकर आदींनी सतीश इंगळे यांचे अभिनंदन केले आहे.