
हर्ष दुबेची अष्टपैलू कामगिरी
नागपूर : विदर्भ संघाने शेवटच्या रणजी सामन्यात हैदराबाद संघावर ५८ धावांनी विजय नोंदवला. अष्टपैलू हर्ष दुबे याने दोन्ही डावात अर्धशतक आणि सहा विकेट घेऊन संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.
हैदराबाद संघाला विजयासाठी १९७ धावांची आवश्यकता होती. मात्र, हैदराबाद संघाचा दुसरा डाव ३८.३ षटकात १६१ धावांवर संपुष्टात आला. हर्ष दुबे याने सहा विकेट घेऊन शानदार कामगिरी नोंदवली. पार्थ रेखाडे याने ३३ धावांत दोन बळी घेत त्याला सुरेख साथ दिली.
या रणजी हंगामात हर्ष दुबे याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. हर्ष दुबे याने पहिल्या डावात ६५ आणि दुसऱ्या डावात ५५ धावा फटकावत सामना गाजवला. या विजयासह विदर्भ संघाने ४० गुणांसह आगेकूच कायम ठेवली आहे. नागपूर येथे ८ ते १२ फेब्रुवारी या कालावधीत विदर्भ संघाचा सामना तामिळनाडू संघाशी होणार आहे.
संक्षिप्त धावफलक
विदर्भ : पहिला डाव : ५५.५ षटकांत सर्वबाद १९० (पार्थ रेखाडे २३, अक्षय वाडकर २९, हर्ष दुबे ६५; रक्षण ३-२९, अनिकेत रेड्डी ३-६४).
हैदराबाद : पहिला डाव : ९१.४ षटकांत सर्वबाद ३२६ (तन्मय अग्रवाल १३६, सी व्ही मिलिंद ३८, हिमतेजा ३१, यश ठाकूर ३-८०, अक्षय वखारे २-६२, पार्थ रेखाडे २-५१, हर्ष दुबे २-५७).
विदर्भ : दुसरा डाव : ९५.२ षटकांत सर्वबाद ३५५ (अथर्व तायडे ९३, करुण नायर १०५, हर्ष दुबे ५५, पार्थ रेखाडे ३१, सिराज ३-५९, सीव्ही मिलिंद २-४१).
हैदराबाद : दुसरा डाव : ३८.५ षटकांत सर्वबाद १६१ (राहुल रादेश ४८, हर्ष दुबे ६-५७, पार्थ रेखाडे २-३३).