
बशीर चिचकर यांचा ग्रामीण भागातील खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी पुढाकार
महाड : रायगड जिल्हा क्रिकेट संघटनेचे सचिव आणि एसबीसी क्रिकेट अकादमीचे अध्यक्ष बशीर चिचकर यांनी बिरवाडी येथे क्रिकेट अकादमी सुरू केली आहे.
बिरवाडी सारख्या ग्रामीण भागात बशीर चिचकर यांनी एसबीसी क्रिकेट अकादमी सुरू केल्याने ग्रामीण भागातील युवा क्रिकेटपटूंना दर्जेदार प्रशिक्षण घेण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.
बिरवाडी सारख्या ग्रामीण भागात एसबीसीने सुरू केलेल्या क्रिकेट अकादमीमुळे अनेक ग्रामीण खेळाडू नावारूपाला येतील व क्रिकेटच्या विकासाच्या दृष्टीने हे महत्वाचे पाऊल असल्याचे मत रायगड जिल्ह्यातील नावाजलेले माजी खेळाडू ॲड राजन गायकवाड यांनी एसबीसी क्रिकेट ॲकॅडमीच्या बिरवाडी शाखेच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव व अकादमीचे अध्यक्ष बशीर चिचकर यांनी एसबीसी क्रिकेट अकादमी गेली १४ वर्षे महाड येथे क्रिकेट प्रशिक्षण देत आहे. या अकादमीच्या माध्यमातून अनेक खेळाडू आता नावारूपाला येत आहेत, राज्यपातळीवर खेळत आहेत. ग्रामीण भागात अनेक गुणवंत खेळाडू आहेत त्यांनाही संधी मिळावी ते पुढे यावेत म्हणून बिरवाडी सारख्या ग्रामीण भागात ही अकादमी सुरू करत असल्याचे सांगितले.
महाड मध्ये अत्यंत कष्टाने मेहनतीने व चिकाटीने ही अकादमी उभी केली असून प्रशस्त मैदानही उभे केले आहे. महाड तालुक्यातील खेळाडू राज्यपातळीवर व देशपातळीवर खेळतील असा विश्वास व्यक्त केला.
एसबीसी क्रिकेट अकादमीच्या बिरवाडी शाखेचे शानदार उद्घाटन रायगड जिल्ह्याचे माजी खेळाडू विनायक जाधव यांच्या हस्ते झाले. यावेळी रायगड जिल्ह्याचे माजी खेळाडू विजय जाधव, अशोक कोकणे, ॲड दत्ता वाडकर, ॲड राजन गायकवाड, संस्थेचे माजी अध्यक्ष बशीर चिचकर, प्रशिक्षक आवेश चिचकर, अल्तमश चिचकर, तहा चिचकर, ॲड मनोज पवार, गफूर आडकर, मौलाना आदिल चिचकर आदी मान्यवर उपस्थित होते.
ॲड राजन गायकवाड पुढे म्हणाले की, ‘आजच्या मोबाईलच्या दुनियेत असलेल्या या पिढीला मैदानी खेळाकडे आकर्षित करण्याचा हा त्यांचा प्रयत्न अत्यंत सकारात्मक आहे. अकादमीचे संस्थापक अध्यक्ष बशीर चिचकर व प्रशिक्षक आवेश चिचकर यांना धन्यवाद देत ग्रामीण भागातील होतकरू क्रिकेटर्सना सिझन बॉल क्रिकेट खेळण्याची व शिकण्यची संधी मिळणार असून या अकादमीमुळे ग्रामीण भागात सिझन बॉल क्रिकेटचा एक प्लॅट फॉर्म निर्माण झाला असल्याचे सांगितले.
ही अकादमी बिरवाडीसारख्या ग्रामीण भागात सुरू केल्याने अनेक क्रीडा रसिकांनी या अकादमीचे स्वागत केले.