
सहा क्रीडा प्रकारात स्पर्धेचे आयोजन, भारतीय एन्ड्युरन्स असोसिएशनचे अध्यक्ष योगेश कोरे यांची माहिती
मुंबई : सातव्या एन्ड्युरन्स राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन ७ फेब्रुवारीपासून करण्यात आले असून या स्पर्धेत सहा क्रीडा प्रकारांत ८०० खेळाडूंचा सहभाग असणार आहे, अशी माहिती एन्ड्युरन्स इंडियाचे अध्यक्ष योगेश कोरे यांनी दिली.
खोपोली येथे याक पब्लिक स्कूल या ठिकाणी राष्ट्रीय एन्ड्युरन्स स्पर्धा ७ ते ९ फेब्रुवारी या कालावधीत रंगणार आहे. ९ फेब्रुवारी रोजी स्पर्धेचा समारोप होणार आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा ६ वेगवेगळ्या प्रकारामध्ये स्पर्धक सहभागी होणार आहेत मागील वर्षी मुंबई येथे पार पडलेल्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघाने सर्वाधिक पदके मिळवून प्रथम क्रमांकावर स्थान मिळवले होते. या वेळी देखील महाराष्ट्रातील खेळाडू आपला दबदबा कायम ठेवण्यासाठी मैदानात उतरतील.
८ फेब्रुवारी रोजी स्पर्धेचे उद्घाटन मंगेश मंदाकिनी नरसिंह चिवटे, कक्ष प्रमुख, उप-मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष तथा विशेष कार्यकारी अधिकारी, उप-मुख्यमंत्री कार्यालय मुंबई यांच्या हस्ते करण्यात येणार आहे असे भारतीय एन्ड्युरन्स असोसिएशनचे अध्यक्ष योगेश कोरे यांनी सांगितले आहे.
या स्पर्धेसाठी भारतातील ८०० हून अधिक खेळाडूंचा सहभाग नोंदवला आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी खेळाडूंची निवड आंतरराष्ट्रीय एन्ड्युरन्स स्पर्धेसाठी करण्यात येणार आहे. स्पर्धेमध्ये महाराष्ट्र सहित कर्नाटक, तामिळनाडू, आंद्र प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगड, तेलंगणा, केरला, गोवा या राज्यातील एकूण ८०० हून अधिक स्पर्धक सहभागी होणार आहे.स्पर्धेचे आयोजन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून करण्यात येणार आहे असे भारतीय संघटनेचे चीफ रेफ्री दशरथ बंड यांनी सांगितले.
या स्पर्धेच्या आयोजना संदर्भात आणि राष्ट्रीय वार्षिक सर्व साधारण सभेचे आयोजन ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता खोपोली येथे आयोजित करण्याचे निश्चित केले आहे, अशी माहिती राष्ट्रीय संघटनेचे सेक्रेटरी संदीप सोलंकी यांनी दिली आहे. या स्पर्धेचे मीडिया पार्टनर म्हणून ‘स्पोर्ट्स प्लस’ हे काम पाहणार आहे. तसेच या स्पर्धेला जीविशा पेन क्लिनिक (पुणे) यांचे सहकार्य लाभले आहे.
Superb work
Thank You So Much.