
मुंबई : गिरनार आंतर रुग्णालय क्रिकेट स्पर्धेच्या एलाईट ग्रुपमध्ये कोकिलाबेन आणि टाटा यांच्यात विजेतेपदासाठी मुकाबला होईल.
उपांत्य फेरीच्या सामन्यात टाटा संघाने लिलावती संघाचा ७ गडी राखून आरामात पराभव केला. विजयी संंघाच्या शैलेश श्रीखंडेने ६५, नरेश सरदाराने ४० धावा केल्या. दशरथ वलोदोराने ३ आणि खिमजी मकवानाने २ बळी घेतले. लिलावती संघाच्या संदीप कणसेने ४५, रुपेश कोंडाळकरने २० धावा केल्या.
दुसऱ्या उपांत्य सामन्यात कोकिलाबेन संघाने नानावटी संघाचा ११ धावांनी पराभव केला. विजयी संघाच्या अल्केत तांडेल नाबाद ४३, संकेत केणी ३५ आणि प्रतीक शाहने २६ धावा केल्या. कोकिलाबेन संघाच्या चिन्मय घरत देवेंद्र भानसेने अनुक्रमे ३, २ बळी घेतले. नानावटी संघाच्या प्रतीक पाताडे याने भेदक गोलंदाजी करत २१ धावात ५ बळी घेतले. तसेच किशोर कुयेस्कर ३८ धावा, फरहान काझी ४३ धावा यांनी विजयासाठी जोरदार प्रयत्न केले. १३ फेब्रुवारी रोजी एलाईट ग्रुपचा अंतिम फेरीचा सामना वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे.