बीएआरसी संघाचे बुजुर्ग कबड्डीपटू नरेश पाटील सेवानिवृत्त

  • By admin
  • February 4, 2025
  • 0
  • 21 Views
Spread the love

मुंबई : बीएआरसी संघाचे बुजुर्ग कबड्डीपटू नरेश पाटील ३२ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नुकतेच निवृत्त झाले. पीटीटीए्ए स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या एका छोटेखानी समारंभात बीएआरसीतील वरिष्ठ अधिकारी अविनाश पाटील यांच्या हस्ते नरेश पाटील यांचा शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास बीएआरसी कबड्डी संघाचे सर्व पदाधिकारी, सदस्य, खेळाडू उपस्थित होते. नरेश पाटील यांनी कबड्डी व क्रिकेट स्पर्धेत वयाच्या साठीपर्यंत योगदान दिले. उपस्थित असलेल्या सर्वांनी त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

बीएआरसी कबड्डी संघातील एक अष्टपैलू खेळाडू म्हणून नरेश पाटील यांची ख्याती होती. जेव्हा आपण बीएआरसीमध्ये दाखल झालात तेव्हापासून आजपर्यंत आपण डीएई या कबड्डी स्पर्धेमध्ये सहभागी होऊन आपण सर्वोत्कृष्ट खेळाचे योगदान दिले. आपण असे एकमेव खेळाडू आहात की ज्यांनी वयाच्या साठव्या वर्षांपर्यंत कबड्डी आणि क्रिकेट या दोन्ही खेळामध्ये आपल्या चमकदार कामगिरीचा ठसा उमटवलात.

कबड्डी सामना खेळत असताना प्रतिस्पर्धीच्या उत्कृष्ट चढाईपटूला त्याच्या पायात पकडी करून बाद करण्यामध्ये आपण जे कौशल्य मिळविले होते ते कौतुकास्पद होते. आंतर विभागीय कबड्डी आणि क्रिकेट स्पर्धेमध्ये दरवर्षी आपण सिक्युरिटी डिव्हिजनसाठी विजयाचा झेंडा सतत फडकवत ठेवला. बीएआरसी कबड्डी आणि क्रिकेट संघाला आपली उणीव जाणवेल हे मात्र नक्की.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *