सोलापूर : चंद्रपूर येथे १४ ते १६ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या ५०व्या वरिष्ठ गट पुरूषांच्या राज्य अजिंक्यपद हॅन्डबॉल स्पर्धेकरिता सोलापूर जिल्हा संघ निवड चाचणी ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आली आहे.
या निवड चाचणीतून सोलापूर जिल्ह्याचा हॅन्डबॉल संघ निवडण्यात येईल. या निवड चाचणीत सहभागी होणाऱ्या खेळाडूंनी आपला आधार कार्ड, एक फोटो व नोंदणी शुल्क शंभर रूपये निवड चाचणीच्या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता अश्विनी हॉस्पिटल शेजारी राजीव गांधी इनडोअर स्टेडियमवर संदेश पवार (9975881350) यांच्याशी संपर्क साधावा, असे जिल्हा हॅन्डबॉल संघटनेचे सुहास जाधव व राहुल हजारे यांनी कळविले आहे.