
छत्रपती संभाजीनगर : आठव्या एशियन क्रिकेट प्रीमियर लrग सीजन ८ स्पर्धेत एशियन रायडर्स संघाने विजेतेपद पटकावले.
या स्पर्धेचे उद्घाटन एशियन हॉस्पिटलचे संचालक मॅनेजिंग डायरेक्टर डॉ शोएब हाश्मी यांच्या हस्ते करण्यात आले. अंतिम सामन्यात एशियन रायडर्स संघाने एशियन चॅम्पियन्स संघाचा पराभव करुण चषकावर आपले नाव कोरले. विशेष म्हणजे प्रत्येक संघातून एक महिला खेळाडू सहभागी झाली होती.
स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी एशियन हॉस्पिटलचे चेअरमन डॉ शोएब हाश्मी, डॉ नितिन ताठे, डॉ प्रशांत वळसे, डॉ अविनाश त्रिभुवन, डॉ विजय वालतुरे, डॉ परीक्षित ठाकूर, डॉ अझर पटेल, अॅड हर्षवर्धन त्रिभुवन, मीर अली, फैसल रजवी, सुहास अटकोरे, सतीश सातपुते आदींची प्रमुख उपस्थित होती.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी हर्षवर्धन, सतीश सातपुते, फैसल ,जावेद, पंकज, रणजीत, रोहन, दीपक, निकम, अमीन, गणेश, रफीक, परमेश्वर केकाण आदींनी परिश्रम घेतले.