
परभणी : परभणी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मुंबई यांच्या मान्यतेने आयोजित करण्यात आलेल्या आयटीआय क्रीडा स्पर्धेत परभणी आयटीआयचे वर्चस्व राहिले.
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आयटीआय कौशल्य बलम या मैदानावर झालेल्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत आयटीआयचे वर्चस्व कायम राहिले. या स्पर्धेचे उद्घाटन प्राचार्य विकास आडे, प्राचार्य लोंढे, प्रबंधक श्रीरामकिशन देशमुख, क्रीडा स्पर्धा पंच प्रमुख विजयकुमार तिवारी, कृष्णा कवडी, ढोबळे, माजी क्रिकेटपटू रामदास पवार, गटनिर्देशक धातलवंडे, भगवान काळे, ब्राह्मणे, संदिपान वाघमारे, सुनील वाकोडकर, सुभाष काचगुंडे, गिरीश केदार, सूर्यकांत टिपरसे, शिल्प निदेशक प्रकाश बनाटे, संतोष नालंदे, डोईफोडे आर बी, हाश्मी, गवई यु आर, श्रेष्ठ ए आर, शेख अयुब, करंगळे डी के, विठ्ठल गिरी, सतीश छापरवाल, मिरखेलकर एस एस, पवन संबरकर, किशोर बोराडे, राधिका कुलकर्णी, पी बी जगताप, साकळकर एस एस, शिंदे, बालटकर पी डी, परभणी तालुक्यातील आयटीआयचे प्राचार्य माचेवाड ई जी, देशपांडे सी सी, लोखंडे एस एस, अन्नपूर्णे पी के आदी मान्यवर उपस्थित होते.
या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत खो-खो, व्हॉलीबॉल, क्रिकेट, १०० मीटर धावणे, २०० मीटर धावणे, बुद्धिबळ, कॅरम अशा स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धा यशस्वीतेसाठी प्राचार्य विकास साठे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समित्या गठित करण्यात आल्या होत्या.
या स्पर्धेत पेंटर ट्रेडच्या विद्यार्थ्यांनी व्हॉलीबॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला. क्रिकेट स्पर्धा परभणी आयटीआय संघाने जिंकली. खो-खो स्पर्धेत मुलींच्या संघाने प्रथम पारितोषिक मिळवले. १०० मीटर धावणे व २०० मीटर धावणे या क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक प्राप्त केला. यामुळे विविध स्पर्धेत सहभागी होऊन यश संपादन केल्याबद्दल आयटीआयचे वर्चस्व या क्रीडा स्पर्धेमध्ये पाहावयास मिळाले. या घवघवीत यशाबद्दल प्राचार्य विकास आडे, कार्यालय रजिस्टर रामकिशन देशमुख यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी गुंडेवाड, प्रशांत भुसारे, मारुती रेणेवाड तसेच मुळे पी डी, कच्छवे बी डी, चव्हाण एम पी, शेख अमजद, टाक व्ही एम, शेख युनुस, शेख उस्मान, भराडे आदींनी परिश्रम घेतले.