
नाशिक : टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र आणि नाशिक जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन नाशिक आयोजित १४ वर्षांखालील राज्य अजिंक्यपद स्पर्धा नाशिक येथे उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेतून क्रीडा सह्याद्रीचा खेळाडू दक्ष विनोद गायकवाड याची महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली आहे.
या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी भारतीय टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या महासचिव मीनाक्षी गिरी, वूमन डायरेक्टर धनश्री गिरी, महाराष्ट्र उपाध्यक्ष विलास गिरी व नाशिक जिल्हा सचिव विलास गायकवाड, सहसचिव धनंजय लोखंडे आदी उपस्थित होते.
क्रीडा सह्याद्रीचा खेळाडू दक्ष गायकवाड याची नाशिक संघात निवड झाली होती. त्याने राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये उत्कृष्ट खेळ केला. त्यामुळे दक्ष गायकवाडची राष्ट्रीय स्पर्धेसाठी अष्टपैलू खेळाडू म्हणून महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धा मथुरा येथे होत आहे.