
छत्रपती संभाजीनगर : वोखार्ड ग्लोबल स्कूल आणि जिल्हा बुद्धिबळ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन ८ फेब्रुवारी रोजी वोखार्ड ग्लोबल स्कूल शेंद्रा औद्याोगिक वसाहत येथे करण्यात आले आहे. ही स्पर्धा ७ ते १७ या वयोगटात घेण्यात येणार आहे.
आठ फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजता स्पर्धेला सुरुवात होईल. साखळी पद्धतीने स्पर्धा होणार आहे. प्रत्येक गटात पहिले ५ मुले व ५ मुली यांना चषक देण्यात येईल. तसेच सर्व सहभागी खेळाडूना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी २५० रुपये प्रवेश शुल्क ठेवण्यात आले आहे. स्पर्धेची तांत्रिक जबाबदारी औरंगाबाद चेस अकॅडमी पार पाडत आहे. खेळाडूनी आपले बुद्धिबळ साहित्य आणावे असे आवाहन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त खेळाडूंनी संधीचा उपयोग करून घ्यावा असे आवाहन शाळेकडून करण्यात आले आहे. क्रीडा समन्वयक शेख उमेर (८८७७७७३५५) यांच्याशी संपर्क साधावा.