सातारा परिसरातील बडग स्कूल येथे स्हेनसंमेलन व क्रीडा दिन जल्लोषात साजरा

  • By admin
  • February 4, 2025
  • 0
  • 31 Views
Spread the love

छत्रपती संभाजीनगर : सातारा परिसरातील बडग स्कूल येथे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे जनसंपर्क अधिकारी संजय अंबादास पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रमेश अण्णा बाहुले आणि पांडुरंग बडग हे उपस्थित होते.

यावेळी बोलताना संजय पाटील म्हणाले की, ‘शाळेत मिळणारे संस्कार आयुष्याची पुढची दिशा निश्चित करत असते. त्यामुळे आपल्या जीवनातील उत्कर्षामध्ये शाळा व शिक्षक यांचा मोलाचा सहभाग आहे. आपल्या पाल्यावर कोणतेही संस्कार हे इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या वयात होत असतात. या वयात मनावर कोरलेले संस्कार आयुष्यभर तसेच असतात.’

भाव साक्षरता, वैज्ञानिक दृष्टिकोन, वाहन, विवेक, राष्ट्रीय जबाबदारी, ध्येय निश्चिती, निसर्गबाबतची कृतघ्नता, बहीण भावातील नातं, राष्ट्रीय एकात्मा या समाज घडवणाऱ्या विषयावर लहान लहान मुलांनी सुंदर सादरीकरण करून उत्कृष्ट नृत्याची उपस्थिताना मेजवानी दिली. विविध स्पर्धेमध्ये विविध खेळ व स्पर्धांनी रंगला. विद्यार्थ्यांनी जिद्दीने सर्व स्पर्धेत सहभाग घेतला आणि विजेत्यांना पदके व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कला आणि बौद्धिक क्षमतांचे प्रदर्शन घडवणारा सोहळा ठरला. नृत्य आणि नाट्य यांच्या सादरीकरनाणे संपूर्ण वातावरण सांस्कृतिक रंगात न्हाऊन निघाले. वर्षभर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.

बडग स्कूल मुख्याध्यापिका आश्विनी सुरज बडग यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी वर्षा पांडुरंग बडग, ज्योती संजय पाटील, नीता चैतन्य बडग, प्रणव संजय पाटील, आर्या संजय पाटील, शिक्षकवृंद, परिसरातील नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *