नॅशनल गेम्स : योगेश थोरबोले यांची निवड

  • By admin
  • February 4, 2025
  • 0
  • 30 Views
Spread the love

महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक्स संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी

धाराशिव : देहरादून (उत्तराखंड) येथे होत असलेल्या ३८व्या नॅशनल गेम्स स्पर्धेसाठी धाराशिव जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेचे सचिव योगेश थोरबोले यांची ॲथलेटिक्स क्रीडा प्रकारातून महाराष्ट्र राज्य संघाचे प्रशिक्षक म्हणून निवड झाली आहे.

नॅशनल गेम्स मध्ये ३८ खेळाडू, ३ टीम कोच आणि ४ टीम मॅनेजर असे एकूण ४५ जणांचा चमू सहभागी होणार आहे. ८ ते १२ फेब्रुवारी दरम्यान देहरादून (उत्तराखंड) येथे अॅथलेटिक्स स्पर्धा होणार आहेत. तत्पूर्वी, महाराष्ट्र ॲथलेटिक्स संघटनेच्या वतीने शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी पुणे येथे खेळाडूंचे शिबीर घेण्यात आले. बुधवारी महाराष्ट्राचा संघ उत्तराखंडला रवाना होणार आहे.

योगेश थोरबोले यांचा खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील,आमदार प्रवीण स्वामी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी धाराशिव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष भरत जगताप, महाराष्ट्र राज्य सायकलिंग संघटनेचे सहसचिव अभय वाघोलीकर यांच्यासह खेळाडू पालक यांचे उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *