बॅडमिंटन स्पर्धेत मिश्र दुहेरीत महाराष्ट्राला रौप्यपदक

  • By admin
  • February 4, 2025
  • 0
  • 22 Views
Spread the love

देहरादून : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या जोडीला रुपेरी यशावर समाधान मानावे लागले. महाराष्ट्राच्या दीप रामभिया व अक्षया वारंग या जोडीने बॅडमिंटनमधील मिश्र दुहेरीत के सतीश कुमार व आद्या वरीयथ या तामिळनाडूच्या अग्रमानांकित जोडीला चिवट लढत दिली. मात्र, हा सामना तामिळनाडूच्या जोडीने २१-११, २०-२२, २१-८ असा जिंकला.

परेड ग्राऊंड मधील हॉलमध्ये संपलेल्या मिश्र दुहेरीच्या अंतिम सामन्यात तामिळनाडूच्या सतीश व आद्या या जोडीने आजपर्यंत अनेक राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये अव्वल दर्जाची कामगिरी केली असल्यामुळे त्यांचे पारडे जड मानले जात होते. दीप व अक्षया हे प्रथमच या स्पर्धेत एकत्र खेळत होते. तरीही त्यांनी अंतिम फेरीत स्थान मिळविताना अतिशय चांगला खेळ केला. महाराष्ट्राच्या जोडीचे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पहिलेच पदक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *