
रावेर : कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ विद्यार्थी विकास विभाग अंतर्गत महाविद्यालयीन युवती सभा अंतर्गत अग्नीवीर भरती पूर्व प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात महाविद्यालयातील ४० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे.
या शिबिरात अग्निवीर भरतीसाठी सगळ्या प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यात ग्रांउड व पेपर संदर्भातील सराव आदी प्रशिक्षण देण्यात येत आहे. या शिबिरात प्रशिक्षक म्हणून धनाजी नाना महा फैजपुर कॅडेट युनिटचे विद्यार्थी अजय चौधरी, ओम राजपूत हे प्रशिक्षण देत आहेत.
या शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्राचार्य अनिल पाटील म्हणाले की, ‘अग्निवीर पूर्वप्रशिक्षण हे गरजेचे आहे आणि त्यामुळे सैन्य भरतीसाठी याचा उपयोग करून घेण्याचा व या प्रशिक्षणामुळे आपल्या शारीरिक व्यायाम व मानसिक क्षमतेत वाढ होऊन विद्यार्थ्यात जागरूकता निर्माण होऊ शकते. तसेच येणाऱ्या काळात महाविद्यालयात लवकरात लवकर एनसीसी युनिट सुरू होणार असून त्याचा उपयोग आर्मीमध्ये तसेच अग्निवीर मध्ये भरती होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी होईल. त्यापूर्वी असे कार्यक्रम होणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा संदीप धापसे, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. सत्यशिल धनले, युवती सभा समन्वयक डॉ स्वाती राजकुण्डल, अग्नीवीर पूर्व प्रशिक्षण शिबिराचे कॉर्डिनेटर डॉ उमेश पाटील व सर्व सहभागी विद्यार्थी उपस्थित होते.