
सोलापूर : छत्रपती शिवाजी नाईट कॉलेजने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन बेसबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले.
सी बी खेडगी महाविद्यालय अक्कलकोटने आयोजित केलेल्या या स्पर्धेतील अंतिम सामन्यात छत्रपती शिवाजी नाईट कॉलेजने सोनी महाविद्यालयावर ६-० होमरनने विजय प्राप्त केला.
या विजयी संघास प्रा संतोष गवळी, प्रा सचिन गायकवाड, मारुती घोडके, माजी खेळाडू प्रशांत कदम यांचे मार्गदर्शन लाभले. विजयी खेळाडू आणि मार्गदर्शक यांचे मराठा समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष मनोहरपंत सपाटे जनरल सेक्रेटरी प्रा महेश माने आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मधुकर पवार यांनी अभिनंदन केले.
विजेता संघ
रफिक सय्यद, आदित्य बडवणे, दत्तात्रय पवार, ओम झिपरे, संकेत सोनकडे, श्रीकांत जाधव, गणेश बंडगर, संदेश शिरसाट, जुनेद शेख, अतुल गोसावी, रमेश धोडमनी, शिराज तांबोळी.