
राज्य, राष्ट्रीय पातळीवर चमकणाऱ्या खेळाडूंच्या मातांचा गौरव
निफाड: जिल्ह्यातील विविध क्रीडा प्रकारात राष्ट्रीय पातळी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंच्या मातांचा क्रीडा सह्याद्री व शिव अविष्कार स्पोर्ट्स फाऊंडेशन व निफाड इंग्लिश स्कूलच्या वतीने राजमाता जिजाऊ सन्मान पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
निफाड शहरातील सरस्वती विद्यालयातील सभागृहात राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम झाला. यावेळी सरस्वती विद्यालयाचे चेअरमन नंदलाल चोरडिया, निफाड इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक अरुण महाजन व महाजन, सरस्वती विद्यालयाच्या मुख्याध्यापिका ज्योती बागडे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी अध्यक्षस्थानी अरूण महाजन तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ मिलिंद महाजन व प्रज्ञा महाजन, बीएमसीच्या देशातील पहिल्या महिला फायर ब्रिगेडच्या प्रमुख लता गिते (भाबड), क्रीडा सह्याद्री व शिव अविष्कार स्पोर्ट्स फाऊंडेशनचे अध्यक्ष विलास गायकवाड, विनोद गायकवाड हे मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी राष्ट्रीय व राज्य खेळाडूंच्या आई कावेरी डोंगरे, ज्योती कुमावत, डॉ प्रज्ञा महाजन, प्रज्ञा अमोल जाधव, मंगला नितीन बागुल, लता दीपक गिते (भाबड), लता ठाकरे, पुष्पा सोनार, कल्पना हिरामण खताळे, सारिका दत्तात्रेय घोटेकर, उषा शंकर कवडे, मुक्ता विलास नागरे, सुभावती दिनेश यादव, रुपाली राजेश काकडे, सविता योगेश घोटेकर, ललिता योगश गाजरे, छाया प्रकाश पगार, सीमा सोन्याबापू गंभीरे, मंगल बद्रीनाथ गंभिरे, शुभांगी सुधीर काळे, सविता प्रवीण कोटकर, रेश्मा नवनाथ साबळे, रुबिना आलताब पठाण, वैशाली सचिन ससाणे, जयश्री प्रदीप शिंदे, रुकसाना लियाकत तांबोळी, रोहिणी प्रवीण गोळे, मंगला विनोद गायकवाड, अर्चना संतोष गाडेकर, मनीषा सचिन पडोळ, जयश्री सुनील धुमाळ, सुषमा जितेंद्र कोचर, मोनिका सुनील धुमाळ, कावेरी दशरथ शिंदे, शारदा अविनाश बिदे, चंद्रकला मच्छिंद्र सालमुठे, स्वाती चव्हाण, विद्या जाधव यांचा फेटे बांधून मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
शाळा, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये पदके मिळवणाऱ्या तसेच सहभागी होणाऱ्या खेळाडूंचा गौरव नेहमीच केला जातो. शिवाय या खेळाडूंना प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षकांचा सन्मान केला जातो. मात्र क्रीडा सह्याद्री व शिव अविष्कार स्पोर्ट्स फाउंडेशनने पुढाकार घेऊन प्रथमच खेळाडूंच्या मातांचा राजमाता जिजाऊ पुरस्कार देऊन गौरव केला. या प्रसंगी नीलम बेंडकुळे यांनी सूत्रसंचालन केले. विलास गायकवाड यांनी आभार मानले.