
अवघ्या १३ महिन्यांत ६०१ रेटिंग पॉइंट्सची वाढ !
पुणे : कठोर परिश्रम आणि निष्ठेचे मूर्तिमंत उदाहरण ठरलेल्या विस्मय सच्चर याने विक्टोरियस चेस अकादमी मधील प्रशिक्षणाच्या जोरावर अवघ्या १३ महिन्यांत त्याचा रेटिंग १४०१ वरून २००२ पर्यंत नेण्याचा अभूतपूर्व विक्रम केला आहे.
मुळचा बहरीनचा रहिवासी विस्मय याने विक्टोरियस चेस अकादमीचे संस्थापक आणि मुख्य प्रशिक्षक कपिल लोहाणा यांच्याकडून थेट प्रशिक्षण घेण्यासाठी पुण्यात वर्षभर राहण्याचा धाडसी निर्णय घेतला. आपल्या आईसोबत हॉटेलच्या एका खोलीत संपूर्ण वर्षभर राहून, तो अकादमीला दररोज भेट देत राहिला.
शिक्षण आणि बुद्धिबळ यामध्ये योग्य समतोल राखण्यासाठी, त्याने विदेशातील विद्यापीठातून नववी इयत्तेसाठी दूरस्थ शिक्षणाचा पर्याय निवडला. त्यामुळे त्याला आपल्या बुद्धिबळ प्रशिक्षणावर संपूर्ण लक्ष केंद्रित करता आले. प्रशिक्षक कपिल लोहाणा यांनी दिलेल्या अभ्यास योजनेचे काटेकोर पालन करून विस्मयने २००२ एलो रेटिंग मिळवत आपल्या अथक परिश्रमाचे फळ मिळवले.
हा प्रवास त्याच्या मेहनतीचा आणि योग्य मार्गदर्शनाचा विजय आहे. विक्टोरियस चेस अकादमी अशाच प्रकारे नवोदित बुद्धिबळपटूंना घडवत, त्यांना आंतरराष्ट्रीय यश मिळवण्यासाठी मार्गदर्शन करत आहे.