
एक रौप्य व एक कांस्यपदकाची कमाई
रूद्रपूर : महाराष्ट्राने ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सायकलिंग मधील पदकांची मालिका कायम राखताना बुधवारी महिला गटात एक रौप्य आणि एक कांस्यपदक जिंकले.
महिलांच्या चार किलोमीटर अंतराच्या सांघिक कौशल्य स्पर्धेत महाराष्ट्राला कांस्यपदक मिळाले. या संघात वैष्णवी गाभणे संस्कृती खेसे, सिया ललवाणी व पूजा दानोळी यांचा समावेश होता. महाराष्ट्राने ही शर्यत पाच मिनिटे ३२.६४३ सेकंदात पार केली. हरियाणा (पाच मिनिटे २६.९२० सेकंद) व ओडिशा (पाच मिनिटे ३०.४२३ सेकंद) यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्य पदक जिंकले.
महाराष्ट्राच्या श्वेता गुंजाळ हिने पाच फेऱ्यांचा समावेश असलेल्या ‘केरीन’ सायकलिंग या क्रीडा प्रकारात रौप्यपदक पटकाविले.