राष्ट्रीय एमएमए स्पर्धेत नागपूर संघाला २० पदके 

  • By admin
  • February 6, 2025
  • 0
  • 14 Views
Spread the love

नागपूर : नागपूर मिक्स्ड मार्शल आर्ट टीम आणि अल्टीमेट एमएमए कॉम्बॅट वॉरियर सेंटर संघाने आठव्या राष्ट्रीय एमएमए स्पर्धेत २० पदकांची कमाई केली. 

धार (मध्य प्रदेश) येथे नुकत्याच झालेल्या मिक्सड मार्शल आर्ट्स असोसिएशनच्या आठव्या राष्ट्रीय मिक्स्ड मार्शल आर्ट्स चॅम्पियनशिप स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. एमएमए इंडिया आणि इंटरनॅशनल मिक्स्ड मार्शल आर्ट्स फेडरेशनच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. 

या स्पर्धेत भारतातील सर्व राज्यातील ७०० खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. त्यामध्ये महाराष्ट्र संघाने स्पर्धेत चांगली कामगिरी करुन मोठ्या प्रमाणात पदकांची कमाई केली. नागपूर जिल्ह्यातील अल्टीमेट एमएमए कॉम्बॅट वॉरियर्स सेंटरच्या  संघाने ३ सुवर्ण, ८ रौप्य, ९ कांस्य पदके मिळवली. यामध्ये अंशिका, प्रार्थना मुद्दलवार, शरमाया यांनी सुवर्णपदक तर मुस्कान, अस्मिता, सौम्या, दीपक, हर्षित, कुणाल, आस्था टिचकुले, आरुष, वर्षा, आस्था निरदकर, योगेश, तसेच भूषण चपले, आरव भट्ट, गुरु तडके, विवेक गवाई, कुणाल यांनी कांस्यपदक पटकावले. 

सर्व खेळाडूंना प्रशिक्षक भूषण चपले यांचे मार्गदर्शन लाभलेले आहे. एमएमए इंडिया आणि महाराष्ट्र मिश्र मार्शल आर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष शरीफ बापू यांनी तसेच नागपूर मिक्स्ड मार्शल आर्ट संघचे अधिकारी राकेश बोपचे, विक्रम ठाकूर, विलास नाकादे यांनी सर्व खेळाडूंचे आणि प्रशिक्षकांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *