
छत्रपती संभाजीनगर : देहरादून येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी जिम्नॅस्टिक्स प्रकारात केआरएस स्पोर्ट्स अकादमीच्या शुभम सरकटे व रिद्धी जैस्वाल या दोन खेळाडूंची महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली आहे.
या स्पर्धेत रिद्धी जैस्वाल व शुभम सरकटे हे एक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक्स या प्रकारात सहभागी होणार आहेत. या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना व महाराष्ट्र हौशी जिम्नॅस्टिक्स संघटना यांच्याकडून जिल्ह्याचे आंतरराष्ट्रीय पंच प्रशिक्षक केआरएस स्पोर्ट्स अकादमीचे संचालक प्रा प्रवीण रावण शिंदे यांची महाराष्ट्र एक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक्स संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाली आहे.
तसेच स्पर्धेपूर्वी १० दिवसांचा प्रशिक्षण शिबीर प्रवीण शिंदे यांनी क्रीडा प्रबोधनी पुणे येथे घेतले आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राला सुवर्ण पदक मिळेल असा विश्वास प्रवीण शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र जिम्नॅटिक्स संघटनेचे अध्यक्ष संजय शेटे, उपाध्यक्ष डॉ आदित्य जोशी, सचिव डॉ मकरंद जोशी, डॉ सागर कुलकर्णी, छत्रपती संभाजीनगर जिल्हा जिम्नॅस्टिक्स संघटनेचे अध्यक्ष अॅड संकर्षण जोशी, उपाध्यक्ष डॉ रणजीत पवार, सचिव हर्षल मोगरे, डॉ विशाल देशपांडे आणि केआरएस स्पोर्ट्स अकादमी अँड जिम्नॅटिक्स केंद्राचे अध्यक्ष रावण शिंदे, उपाध्यक्ष अरविंद शिंदे, कोषाध्यक्ष ज्योती शिंदे (मोरे) तसेच सर्व पदाधिकाऱ्यांनी या सर्व खेळाडू, प्रशिक्षक तसेच पालकांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या आहेत.