वस्ताद वसंतराव पाटील यांना राज्यस्तरीय क्रीडारत्न पुरस्कार प्रदान

  • By admin
  • February 6, 2025
  • 0
  • 18 Views
Spread the love

मुंबई : सांगली येथील प्रतिष्ठा फाउंडेशनतफे भाईंदर येथील श्री गणेश आख्याड्याचे वस्ताद वसंतराव पाटील यांनी कुस्ती या खेळात दिलेल्या मोठ्या योगदानाबदल २०२५ चा राज्यस्तरीय प्रतिष्ठित क्रीडारत्न पुरस्कार देऊन नुकतेच गौरविण्यात आले.

समृद्धी मल्टीपर्पज हॉल, जुना येळावी रस्ता, तालुका तासगाव येथे झालेल्या एका समारंभात वसंतराव पाटील यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या प्रसंगी डॉ माणिकराव साळुंखे, डॉ रणधीर शिंदे, डॉ बाबुराव गुरव, नाजरुद्दिन नायकवडी
आदी मान्यवर उपस्थित होते.

मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या सौजन्याने मीरा-भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाडा येथे वस्ताद वसंतराव .पाटील तीन दशकांहून जास्त काळ युवा कुस्तीपटू घडवण्याचे मोठे काम करत आहेत. त्यांनी तयार केलेले अनेक कुस्तीपटू शालेय, विद्यापीठ, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय स्पर्धेत चमक दाखवत आहेत. शहरात कुस्ती प्रशिक्षणासाठी प्रशस्त अशा श्री गणेश आखाड्याची उभारणी करण्यात वसंतराव पाटील यांचे मोठे योगदान होते. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल पाटील यांचे
श्री गणेश आखाड्यातर्फे व भाईंदर वासियांतर्फे खास अभिनंदन.करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *