
सोलापूर : रथसप्तमी दिनानिमित्त उमाबाई श्राविका विद्यालयात जागतिक सूर्यनमस्कार दिन साजरा करण्यात आला.
मुख्याध्यापक सुकुमार मोहोळे, वरिष्ठ दीप्ती शहा, उपमुख्याध्यापिका अश्विनी पंडित, पर्यवेक्षक बाळासाहेब पौळ, सुकुमार वारे, प्रसन्न गाडे, अनुप कस्तुरे, अभिनंदन उपाध्ये, पल्लवी खांडवे यांच्या उपस्थितीत प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.
त्यानंतर विद्यार्थ्यांकडून सूर्यनमस्कार घालण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जानवी येणेगुरे हिने केले. प्रगती थोरवे यांनी आभार मानले. समृद्धी मोरे हिने सूर्यनमस्कारचे फायदे सांगितले. क्रीडा शिक्षक सुहास छंचुरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.