
परभणी : जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेडतर्फे आयोजित राज्यस्तरीय शालेय टेनिस व्हॉलिबॉल स्पर्धेचे शानदार उद्घाटन करण्यात आले.
सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय बाबानगर, नांदेड येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव रावसाहेब शेंदारकर, माजी मंत्री आणि संस्थेचे सचिव डी पी सावंत यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी कोषाध्यक्ष ॲड उदयराव निंबाळकर, टेनिस व्हॉलिबॉल खेळाचे जनक डॉ व्यंकटेश वांगवाड, राज्य सचिव गणेश माळवे, राज्य उपाध्यक्ष रामेश्वर कोरडे, जे ई गुपीले, नांदेड जिल्हा सचिव सतीश भेंडेकर, विपुल दापके, मुख्याध्यापिका एस. आर. कदम, मुख्याध्यापक एम डब्ल्यू कल्याणकर, संजय बेतिवार, संजय ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटन माजी मंत्री डी पी सावंत म्हणाले की, ‘खेळ प्रकाशझोतात आल्यावर राजाश्रय मिळतो त्यासाठी खेळ जोमाने वाढवा. डॉ वांगवाड सरांनी आपल्या महाराष्ट्राच्या मातीतला टेनिस व्हॉलीबॉल खेळांची निर्मिती केली आहे. हा खेळ निश्चित जागतिक स्तरावर जाईल. आपल्या सर्वांनी सहकार्यातून हा खेळ निश्चित वाढू.
कार्यक्रमाचे प्रारंभी महाराष्ट्र राज्यातून आठ विभागातील २५० खेळाडूंनी पाहुण्यांना मानवंदना दिली. यात छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर , मुंबई, पुणे, अमरावती, नाशिक, लातूर विभागतील १४, १७, १९ वर्षांखालील मुले व मुलींचा सहभाग होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक कल्याणकर यांनी केले. सूत्रसंचालन कोल्हेवाडी व संजय केंद्रे यांनी केले. संजय जमदाडे यांनी आभार मानले.
स्पर्धा यशस्वीतेसाठी नांदेड जिल्हा टेनिस व्हॉलिबॉल असोसिएशनचे विभागीय सचिव डॉ राहुल वाघमारे, जिल्हा सचिव कासिम खान, प्रशांत धानोरकर, निलेश डोंगरे, शिवाजी क्षीरसागर, सुरेश सूर्यवंशी, डॉ रमेश नांदेडकर, राहुल वाघमारे, सावते, संतोष मोरे मदने, एम एल सूर्यवंशी, कौटकर आदींनी पुढाकार घेतला.