
छत्रपती संभाजीनगर : उत्तर प्रदेश सॉफ्टबॉल असोसिएशन अंतर्गत मेरठ सॉफ्टबॉल असोसिएशनतर्फे आयोजित १६व्या वरीष्ठ पुरूष आणि महिला वेस्ट झोन सॉफ्टबॉल नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा पुरुष व महिला संघ रवाना झाला आहे.
गुरू चरणसिंग युनिव्हर्सिटी मेरठ येथे ही स्पर्धा ७ ते ९ फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. या स्पर्धेत महाराष्ट्र पुरुष आणि महिला सॉफ्टबॉल संघ स्पर्धेसाठी नागपूर येथून मेरठला रवाना झाला आहे. तत्पूर्वी नागपूर येथे ३ ते ५ फेब्रुवारी दरम्यान मानकापूर नागपूर येथे संघाचे स्पर्धा पूर्व प्रशिक्षण शिबीर पार पडले.
या दोन्ही संघास स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यासाठी जिजामाता पुरस्कार प्राप्त तथा राज्य सॉफ्टबॉल क्रीडा मार्गदर्शक दर्शना पंडित, आंतरराष्ट्रीय सॉफ्टबॉल खेळाडू चेतन महाडिक, प्रणय सुखदेव आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश महाजन, सचिव डॉ प्रदीप तळवेलकर, राज्य संघटनेचे सहसचिव गोकुळ तांदळे, प्रशांत जगताप, सूरजसिंग येवतीकर, रमाकांत बनसोडे, नितीन पाटील, रमेश भेंडेगिरी, किशोर चौधरी, गणेश बेटूदे आदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.
महाराष्ट्राचा पुरुष संघ
हर्षद जळमकर, सुमेध तळवेलकर, संतोष आवचार, स्वप्नील गदादे, सौरभ टोकसे, तिलक पुरके, अजिंक्य पापडकर, रोहित सहारे, विष्णू जाधव, संकेत पावले, अभिषेक सेलोकर, ऋत्विक कुडवे, प्रज्वल जाधव, मयूर धुरांदे, अभिषेक जोंधळे, हर्षद लोखंडे. प्रशिक्षक : संतोष साळुंके, व्यवस्थापक : गणेश बेटूदे.
महाराष्ट्राचा महिला संघ
प्रीती कांबळे, आरती भालेराव, मोनाली नातू, ऐश्वर्या भास्करन, ईश्वरी शिंदे, उर्वशी सनेश्वर, माधुरी महाजन, मोहिनी कोळी, फिजा सय्यद, अंजली पवार, साक्षी येटाले, कल्याणी विधाळे, कृपाली पाटील, रितू फ्रान्सिस, प्रांजल मुगले, नम्रता पवार, मोनाली कांबळे, ज्योती कांबळे.