
सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शंभूराजे बहुउद्देशीय संस्था, श्री रामराव शिंदे मित्र परिवार व सोलापूर चेस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सोलापूर डिस्ट्रीक्ट चेस असोसिएशनच्या मान्यतेने रविवारी (९ फेब्रुवारी) सकाळी १० वाजता टाकळीकर मंगल कार्यालय, जुळे सोलापूर येथे खुल्या तसेच १२, १०, ८ व ६ वर्षांखालील बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन केले आहे.
ही स्पर्धा फिडेच्या स्विस लीग नियमानुसार खेळाडूंच्या संख्येनुसार ५ ते ८ फेऱ्यात संपन्न होणार आहे. खुल्या गटातील प्रथम क्रमांकासाठी २००० रुपये, १५००, १०००, ८००, ६००, ५००, ४००, ३००, २५० रुपये तसेच १५, १२, १०, ८ व ६ वर्षांखालील प्रत्येक गटात गटात देखील रोख पारितोषिकांसह ६५ बक्षिसे ठेवण्यात आलेली आहेत. विजेत्या खेळाडूंना एकूण २५ हजार रुपयांपर्यंतची रोख बक्षिसे, ‘शिवछत्रपती चषक’ व मेडल्स देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी प्रवेश फी २०० असून इच्छुक खेळाडूंनी अधिक माहितीसाठी उदय वगरे ८८८८०४५३४४ व प्रशांत पिसे ९१५६८१५९६३ यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनाचे जिल्हाध्यक्ष रामराव शिंदे व संस्थेचे सचिव सुमुख गायकवाड यांनी केले आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवावा असे आवाहन सोलापूर डीस्ट्रीक्ट चेस असोसिएशनचे सोलापुर डीस्ट्रीक्ट चेस असोसिएशनचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते पाटील व सोलापूर चेस अकॅडेमीचे अध्यक्ष महेश धाराशिवकर आदींनी केले आहे.