
छत्रपती संभाजीनगर : देवगिरी महाविद्यालयाचा दीपक अर्जुन याने राष्ट्रीय एरोबिक जिम्नॅस्टिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले.
राष्ट्रीय एरोबिक जिम्नास्टिक स्पर्धेमध्ये सुवर्णपदक प्राप्त केल्यामुळे त्याची उत्तराखंड येथे होणाऱ्या ३८व्या नॅशनल गेम्स स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. या निवडीबद्दल मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस आमदार सतीश चव्हाण, स्थानिक नियामक मंडळाचे सदस्य पंडितराव हर्षे, प्राचार्य डॉ अशोक तेजनकर, उपप्राचार्य एन जी गायकवाड, उपप्राचार्य सुरेश लिपाने यांनी दीपकचे अभिनंदन केले. क्रीडा विभाग प्रमुख प्रा राकेश खैरनार यांचे दीपकला मार्गदर्शन लाभले आहे.