
सोलापूर : सोलापूर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने जिल्हा सब ज्युनियर अॅथलेटिक्स स्पर्धा शनिवारी (८ फेब्रुवारी) शासकीय मैदान नेहरूनगर येथे आयोजित केली आहे.
ही स्पर्धा ८, १०, १२ व १४ वर्षाखालील मुले व मुलींच्या गटात होईल. ८ वर्षेसाठी (जन्मतारीख १ मार्च २०१७ ते २८ फेब्रुवारी २०१९), १० वर्षेसाठी (१ मार्च २०१५ ते २८ फेब्रुवारी २०१७), १२ वर्षेसाठी (१ मार्च २०१३ ते २८ फेब्रुवारी २०१५) व १४ वर्षेसाठी ( १ मार्च २०११ ते २८ फेब्रुवारी २०१३) या दरम्यान जन्मलेले खेळाडू असावेत. या स्पर्धेसाठी जन्मदाखला महानगरपालिका नगरपालिका व ग्रामपंचायतचे असणे अनिवार्य आहे. जिल्हा स्पर्धेत यशस्वी झालेल्या खेळाडूंची निवड २३ व २४ फेब्रुवारी दरम्यान केबीपी कॉलेज पंढरपूर येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य सब ज्युनियर ॲथलेटिक्स स्पर्धासाठी होणार आहे
इच्छुक खेळाडूंनी तांत्रिक नियोजन प्रमुख चेतन धनवडे (9921114142), सूर्याजी लिंगडे (8805042099) अथवा स्पर्धा प्रमुख दशरथ गुरव (9689283859) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा संघटनेचे सचिव राजू प्याटी यांनी केले आहे.