
सोलापूर : पटना (बिहार) येथे ९ ते १४ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या १९ वर्षांखालील ६८व्या शालेय राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेसाठी महाराष्ट्र मुलींच्या संघाचे प्रशिक्षक म्हणून पवन भोसले यांची निवड झाली आहे.
महाराष्ट्र संघाचे सराव शिबिर छत्रपती संभाजीनगर येथे घेण्यात आले. या संघात सोलापूरच्या यज्ञेश्वर पाटील, श्रेयस वाघमारे, श्रुतिका चव्हाण व श्रावणी शिंदे यांचा समावेश आहे. पवन भोसले हे बी एफ दमाणी प्रशाला व श्री सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये क्रीडा शिक्षक आहेत. महाराष्ट्र तलवारबाजी संघटनेचे उपाध्यक्ष प्रकाश काटुळे, सचिव उदय डोंगरे व जिल्हा सचिव दीपक शिंदे यांनी त्यांचे अभिनंदन केले.