
तामिळनाडू संघाने पटकावले विजेतेपद, गुजरात संघ तृतीय
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरातील विभागीय क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आलेल्या ६८व्या राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत १७ वर्षांखालील गटात तामिळनाडू संघाने सांघिक विजेतेपद पटकावले. महाराष्ट्र संघाने उपविजेतेपद मिळवले.
विभागीय क्रीडा संकुलातील एन्ड्युरन्स टेनिस सेंटर येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. १७ वर्षांखालील मुलांच्या राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत संघिक खेळात तामिनाडू संघाने महाराष्ट्र संघाचा २-१ अशा फरकाने पराभव करून सुवर्णा पदक पटकावले. महाराष्ट्र संघाला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. गुजरात संघाने कांस्य पदक मिळवले.
तसेच १७ वर्षांखालील मुलांच्या एकेरी स्पर्धेत तामिळनाडूच्या रोहित याने चंदीगडच्या रिभव सरोहा याचा ६-३ अशा फरकाने पराभव करून सुवर्ण पदक प्राप्त केले. महाराष्ट्राच्या दक्ष पाटील याने कांस्य पदक प्राप्त केले.
या सर्व खेळाडूंना कमांडिग ऑफिसर कर्नल एन सी आप्पा, केंद्रीय विद्यालयाचे प्रा अनिल यादव, जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, एन्ड्युरन्स ग्रुपच्या प्रीती राज, एस एन दत्ता यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी अभिनव मिश्रा, टेनिस सेंटरचे प्रमुख आशुतोष मिश्रा स्पर्धेचे सुपरवायझर प्रवीण गायसमुद्रे, मेहुल केनिया आदी उपस्थित होते.