
पुणे : पिंपरी चिंचवड परिसरातील विशाल नगर येथे नेको स्काई पार्क सोसायटीतर्फे पर्यावरणपूरक लहान मुलांची सायकल रॅली काढण्यात आली.
नेको स्काई पार्क सोसायटी ही नेहमी पर्यावरणपूरक कार्यक्रम राबवत असते. नेको स्काई पार्क सोसायटी मध्ये राहणाऱ्या लहान मुलांना पर्यावरणाचे महत्व कळावे त्याकरिता १४ किलोमीटर अंतराची सायकल सहल आयोजित केली होती. सहलीमध्ये १६ वर्षांखालील ६१ मुलांनी सहभाग घेतला होता. या मुलांची ९ विभागात विभागणी करून प्रत्येक ग्रुपला एक ज्येष्ठ मार्गदर्शक देण्यात आला होता. त्याचसोबत प्रत्येक गोष्टी करीता स्वयंसेवक व मार्गक्रमण संचलन शिस्तबद्ध व्हावे याकरिता आधार व्यवस्था होती. त्यात एकंदर ८४ स्वयंसेवक होते.
ही सायकल रॅली वाहतुकीचे नियम पाळत सोसायटी, जुपिटर हॉस्पिटल, औंध बानेर लिंक रस्ता, रक्षक चौक मार्गे शहीद अशोक कामटे उद्यानात पोचली. एकूण १४ किलोमीटर अंतराचा सायकल प्रवास मुलांनी अत्यंत आनंदाने पूर्ण केला. नेको स्काई पार्क सोसायटीच्या रहिवाशांनी आखलेल्या या सहलीला यशस्वीतेसाठी ज्येष्ठ नागरिक सदस्यांचा मोठा वाटा होता. यात मुले, त्यांचे पालक, ज्येष्ठ नागरिक मिळून १६६ जणांचा सहभाग घेतला होता. या सहली मधून मुलांना व्यायामाचे महत्त्व कळले, सायकलिंगमुळे प्रदुषण कमी होते हे समजले. तसेच वाहतुकीचे नियम सुद्धा कळले. तुषार कामटे यांची या प्रसंगी मुख्य अतिथी म्हणून उपस्थिती होती. तसेच बाणेर येथील डाॅ शोएब हे विशेष अतिथी होते.