
अशी कामगिरी करणारा भारताचा पाचवा गोलंदाज
नागपूर : भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा याने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात शानदार गोलंदाजी करत तीन विकेट घेतल्या. या कामगिरीसह जडेजाने भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६०० विकेट पूर्ण केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा जडेजा हा पाचवा भारतीय गोलंदाज आहे.
रवींद्र जडेजा याने त्याच्या कारकिर्दीत भारतासाठी ८० कसोटी सामन्यांमध्ये ३२३ विकेट, १९८ एकदिवसीय सामन्यांमध्ये २२३ विकेट आणि ७४ टी २० सामन्यांमध्ये ५४ विकेट घेतल्या आहेत.
जडेजाने अँडरसनला मागे टाकले
रवींद्र जडेजाने जेकब बेथेलला बाद करून भारताला आठवे यश मिळवून दिले. अर्धशतक झळकावल्यानंतर बेथेल बाद झाला. त्याने ६४ चेंडूत ५१ धावा केल्या. जडेजाची ही सामन्यातील दुसरी विकेट होती. यासह, जडेजाने एक विशेष कामगिरी केली. तो भारत आणि इंग्लंडमधील एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे. या संघाविरुद्ध जडेजाने आतापर्यंत एकदिवसीय सामन्यांमध्ये ४२ विकेट्स घेतल्या आहेत. या बाबतीत त्याने जेम्स अँडरसनला मागे टाकले ज्याने दोन्ही देशांमधील एकदिवसीय मालिकेत ४० बळी घेतले होते.
भारत-इंग्लंड एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट्स
रवींद्र जडेजा : ४२
जेम्स अँडरसन : ४०
अँड्र्यू फ्लिंटॉफ : ३७
हरभजन सिंग : ३६
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट्स
अनिल कुंबळे : ९५३ विकेट
रविचंद्रन अश्विन : ७६५
हरभजन सिंग : ७०७
कपिल देव : ६८७
रवींद्र जडेजा : ६००
झहीर खान : ५९७
जवागल श्रीनाथ : ५५१
मोहम्मद शमी : ४५२
जसप्रीत बुमराह : ४४३
इशांत शर्मा : ४३४