
छत्रपती संभाजीनगर : पहिला विश्वचषक खो-खो स्पर्धा जिंकणाऱ्या भारतीय संघातील महाराष्ट्राच्या खेळाडू आणि इतर पदाधिकाऱ्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

बीड जिल्ह्यातील आष्टी येथे हा गौरव सोहळा झाला. या प्रसंगी भारतीय खो-खो संघातील महाराष्ट्राचे खेळाडू प्रियंका इंगळे, अश्विनी शिंदे, रेश्मा राठोड, प्रतीक वाईकर, सुरेश गरगटे, रामजी कश्यप यांचा स्मृतिचिन्ह देऊन मुख्यमंत्र्यांनी गौरव केला. या सोहळ्यात भारतीय खो-खो निवड समिती सदस्य अॅड गोविंद शर्मा तसेच महाराष्ट्र खो-खो संघटनेचे सरचिटणीस व विश्वचषक खो-खो स्पर्धा प्रमुख डॉ चंद्रजित जाधव, भारतीय खो-खो संघाचे प्रशिक्षक शिरीन गोडबोले, प्राची वाईकर यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
या प्रसंगी आमदार सुरेश धस, मंत्री पंकजा मुंडे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.