
पुणे : क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे कार्यालयाच्या अधिपत्याखालील क्रीडा अधिकारी गट ब (अराजपत्रित) आणि क्रीडा मार्गदर्शक गट ब (अराजपत्रित) यांना तालुका क्रीडा अधिकारी गट ब (राजपत्रित) पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. या पदोन्नतीचा लाभ २१ जणांना झाला आहे.
२१ जणांना तालुका क्रीडा अधिकारी या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. त्यात लक्ष्मण पवार (जयसिंगपूर, जि. कोल्हापूर), प्रशांत पवार (जत, जि. सांगली), महेश पाटील (शहादा, जि. नंदुरबार), किशोर बोंडे (मानोरा, जि. वाशिम), मनोहर पाटील (साक्री, जि. धुळे), विजया खोत (अचलपूर, जि. अमरावती), प्रकाश वाघ (पेण, जि. रायगड), ज्ञानेश्वर खुरंगे (संगमनेर, जि. अहिल्यानगर), राजू वडते (धारणी, जि. अमरावती), प्रवीण बोरसे (मुख्यालय पुणे), सुधाकर जमादार (राधानगरी, जि. कोल्हापूर), रश्मी आंबेडकर (कुर्ला, जि. मुंबई उपनगर), अनिराम मरसकोले (सालेकसा, जि. गोंदिया), जमीर अकबर अत्तार (आर्वी, जि. वर्धा), तानाजी मोरे (इंदापूर, जि. पुणे), योगेंद्र खोब्रागडे (रामटेक, जि. नागपूर), संदीप खोब्रागडे (आष्टी, जि. वर्धा), प्रशांत कुमार मंडले (मलकापूर, जि. बुलढाणा), भैरवनाथ नाईकवाडी (किनवट, जि. नांदेड), गणेश पवार (तुळजापूर, जि. धाराशिव), सुनील शरदचंद्र धारुरकर (दापोली, जि. रत्नागिरी) अशा २१ जणांना तालुका क्रीडा अधिकारी म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. अवर सचिव अशोक दमय्यावार यांनी हा आदेश जारी केला आहे.