
नागपूर : एमआयसीएसआरने आयोजित केलेल्या विदर्भ रॅकिंग कॅरम स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद कुणाल राऊतने पटकावले आहे.
अंतिम सामन्यात कुणाल राऊत याने नितीन मेश्राम याला १९-१३, २२-२ असे पराभूत करुन विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
माजी कॅबिनेट मंत्री रमेश बंग यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी एस क्यू झमा, के आर अर्जुन, डी के तापडिया, विनोद चतुर्वेदी, डॉ राम ठाकूर, विदर्भ कॅरम असोसिएशनचे सचिव पी. एस. बच्छर, विदर्भ कॅरम असोसिएशनचे निमंत्रक इक्बाल मोहम्मद, एन के बक्षी, स्वप्नील ठाकरे, शेखर बेंद्रे उपस्थित होते. नवल मेश्राम यांनी सूत्रसंचालन केले. महेश बंग आणि इतरांनी पाहुण्यांचे स्वागत केले. या स्पर्धेत दोन ब्लॅक स्लॅम कुणाल राऊत आणि मोहनीश मेश्राम यांनी केले. गुरुचरण तांबे याने व्हाईट स्लॅम गोल केला आहे.