
अंतिम सामन्यात पीईएस पॉलिटेक्निक संघावर रोमहर्षक विजय
छत्रपती संभाजीनगर : एमआयटी पॉलिटेक्निक कॉलेजतर्फे आयोजित करण्यात आलेल्या आंतर पॉलिटेक्निक क्रिकेट स्पर्धेत एमआयटी पॉलिटेक्निक कॉलेज संघाने विजेतेपद पटकावले.
एमआयटी क्रिकेट स्टेडियमवर ही स्पर्धा झाली. या स्पर्धेत एमआयटी पॉलिटेक्निक कॉलेज संघाने अंतिम सामन्यात पीईएस पॉलिटेक्निक कॉलेज संघाचा रोमहर्षक सामन्यात एक विकेट राखून पराभव करत विजेतेपद संपादन केले. या स्पर्धेत १६ संघांनी सहभाग घेतला होता. बाद पद्धतीने ही स्पर्धा घेण्यात आली. अंतिम सामन्यात एमआयटी संघाकडून पार्थ कदम, रोहन मुरकुटे, विराज शाहूराजे, उमेझ शेख, पेटीवाला यांनी चमकदार कामगिरी बजावली.

पारितोषिक वितरण कार्यक्रमास शासकीय तंत्रनिकेतनचे समन्वयक गणेश घुगे, किरण दांडे, रुपेश देशमुख, अरविंद नागरीक आदी मान्यवर उपस्थित होते. एमआयटीचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ प्रसाद कुलकर्णी, अनिल चिक्याल, श्रीपाद जांभईकर, विलास त्रिभुवन, क्रिकेट प्रशिक्षक प्रीतेश चार्ल्स यांनी स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले. पंच व स्कोअरर म्हणून आशिष पवार, स्वप्नील राठोड, अमित पवार, विवेक भारती, अभिजीत कोंडकर, गजानन सूर्यवंशी, विजय अहिर यांनी पुढाकार घेतला होता.
विजेत्या एमआयटी क्रिकेट संघाचे जीएस मंडळाचे अध्यक्ष यज्ञवीर कवडे, एमआयटीचे महासंचालक मुनिश शर्मा व एमआयटीचे प्राचार्य सुनील देशमुख यांनी अभिनंदन केले.
विजेता एमआयटी संघ : आदर्श चव्हाण, सोहम धावणे, आकाश गुसिंगे, झायन खान, रोहन मुरकुटे, पार्थ कदम, नहूश पाटील, विश्वेश राठोड, रोहन काथार, विराज शाहूराजे, शेख उमेज, सुमेध बनसोडे, तनय वाघमारे, ओंकार ठाटेकर, यशराज चव्हाण, मिहिर मांडे.