
छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शिवछत्रपती महाविद्यालयातील क्रीडा विभाग प्रमुख डॉ रणजीत पवार यांची देहरादून (उत्तराखंड) येथे होणाऱ्या भारतीय ऑलिम्पिक संघटना आयोजित ३८व्या नॅशनल गेम्स स्पर्धेसाठी राष्ट्रीय जिम्नास्टिक पंच म्हणून निवड झाली आहे. या निवडीबद्दल महाविद्यालय विकास समितीचे प्रदीप चव्हाण, प्राचार्य डॉ राजेंद्र पवार यांनी अभिनंदन केले आहे.