
स्पर्धेत ४५ शाळांमधील ५०० खेळाडू सहभागी
पुणे : डीएस पॉवरपार्टस यांच्या वतीने आयोजित ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा याने पुरस्कृत केलेल्या यूबीएस अॅथलेटिक्स किड्स करंडक या राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे आयोजन पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मैदानावर रविवारी (९ फेब्रुवारी) करण्यात आले आहे. या स्पर्धेत शहरांतील ४५ शाळांमधील ५०० खेळाडू झुंजणार आहेत.
याविषयी अधिक माहिती देताना स्पर्धा संचालक निखिल लढ्ढा यांनी सांगितले की, ही स्पर्धा ७, ८, ९, १०, ११, १२, १३, १४, १५ वर्षांखालील मुले व मुलींच्या गटात रंगणार आहे. यामध्ये ६० मीटर धावणे, लांब उडी व चेंडूफेक या तीन क्रीडा प्रकारांमध्ये हे शालेय खेळाडू आपले कौशल्य पणाला लावणार आहेत. याआधी या स्पर्धेच्या निवड चाचणी प्राथमिक फेऱ्या पुणे, हैद्राबाद आणि मुंबई या ठिकाणी यशस्वीपणे पार पडल्या. या निवड चाचणी स्पर्धंला भरघोस प्रतिसाद लाभला होता. यामध्ये पुणे शहरातून ४५ खाजगी व शासकीय शाळांमधील १२ हजाराहून अधिक शालेय खेळाडूंनी धावणे, लांब उडी व चेंडुफेक या तीन क्रीडा प्रकारांच्या निवड चाचणीत सहभाग घेतला होता.
स्पर्धेसाठी निवड करण्यात आलेल्या शाळांमध्ये फकीरभाई पानसरे उर्दू प्राथमिक शाळा, लीलाबाई कांतिलाल खिवंसरा प्राथमिक शाळा, महात्मा ज्योतिबा फुले प्राथमिक शाळा, हुतात्मा चाफेकर प्राथमिक शाळा, मुलींची शाळा क्रमांक ५६/१, वाल्हेकरवाडी मुले प्राथमिक शाळा, प्राथमिक शाळा रावेत क्रमांक ९७, साई जीवन विद्यालय, आला हजरत इमाम अहमद रझा उर्दू प्राथमिक शाळा, प्राथमिक शाळा वाकड, पिंपळे गुरव प्राथमिक शाळा, पिंपळे निलख शाळा, सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा, भोसरी मुलींची शाळा व इंग्लिश मीडियम स्कूल, हजरत उमर फारुकी (रझी) उर्दू प्राथमिक शाळा, निगडी प्राथमिक शाळा, किसनराव अंतुजी भालेकर प्राथमिक शाळा, प्रबोधनकार ठाकरे विद्यामंदिर प्राथमिक शाळा, रहाटणी प्राथमिक शाळा, यशवंतराव चव्हाण उर्दू प्राथमिक शाळा, डॉ अल्लामा इक्बाल उर्दू प्राथमिक शाळा, श्री छत्रपती शाहू महाराज प्राथमिक शाळा, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मुले प्राथमिक शाळा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्राथमिक शाळा, पोदार इंटरनॅशनल स्कूल (आंबेगाव), पोदार इंटरनॅशनल स्कूल (वाकड), धनीराज शाळा वाकड, डॉ सायरस पूनावाला सीबीएसइ शाळा, अलार्ड पब्लिक स्कूल, विखे पाटील मेमोरियल स्कूल, आरएमडी सिंहगड स्प्रिंग डेल स्कूल, विकसित ग्लोबल हायस्कूल, ढोले पाटील स्कूल फॉर एक्सलन्स, पोदार इंटरनॅशनल स्कूल उंड्री, एज्युकॉन इंटरनॅशनल स्कूल, इऑन ज्ञानांकुर स्कूल, सन ब्राइट स्कूल मराठी माध्यम स्कूल, सन-ब्राइट इंग्लिश मीडियम स्कूल, जी के गुरुकुल, युरेका इंटरनॅशनल स्कूल, न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, डेलमोंट इंग्लिश मीडियम स्कूल आणि शिवभूमी महाविद्यालय यांचा समावेश आहे.
यूबीएस अॅथलेटिक्स किड्स स्पर्धेची राष्ट्रीय अंतिम मुंबई येथे १५ फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे.