नॅशनल गेम्स : जलतरणात १४ वर्षीय धिनिधी देसिंघूची विक्रमी कामगिरी

  • By admin
  • February 8, 2025
  • 0
  • 25 Views
Spread the love

तीन राष्ट्रीय विक्रमासह नऊ सुवर्णपदकांची कमाई 

गणेश माळवे, गौरव डेंगळे 

देहरादून (उत्तराखंड) : गोलापूर येथील मानसखंड तरांतल येथे ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत धिनिधी देसिंघू हिने ५७.३८ सेकंदाच्या विक्रमी वेळेसह महिलांची १०० मीटर फ्री स्टाईल स्पर्धा जिंकली. १४ वर्षीय धिनिधी हिने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तीन विक्रम मोडत नऊ सुवर्ण पदकांसह एकूण ११ पदकांची कमाई केली आहे. 

यापूर्वी गोव्यातील राष्ट्रीय स्पर्धेमध्ये तिने ५७.८७ सेकंद या वेळेत १०० मीटर फ्रीस्टाइल स्पर्धा जिंकली होती. धिनिधी देसिंघूने नायशा शेट्टी, विदित शंकर आणि सहकारी ऑलिम्पियन श्रीहरी नटराज यांच्यासोबत कर्नाटकला ४ मिनिटे आणि ३.९१ सेकंदांच्या वेळेसह मिश्र ४x१०० मीटर मेडले जिंकण्यात मदत केली. देसिंघूचे हे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील ९ सुवर्ण पदक ठरले. देसिंघूने आपले वर्चस्व कायम ठेवत महिलांच्या ४०० मीटर फ्रीस्टाइल जलतरण स्पर्धेत नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला.

१४ वर्षांच्या मुलीने ४:२४.६० अशी वेळ नोंदवली आणि गतवर्षी वरिष्ठ नागरिकांमध्ये हशिका रामचंद्रने स्थापित केलेला ४:२४.७० चा राष्ट्रीय जलतरण विक्रम मोडीत काढला.तिने यापूर्वी दिल्लीच्या भव्य सचदेवाने ४:२७.९३ च्या रचलेला रेकॉर्ड देखील मोडला.त्यानंतर देसिंघूने श्रीहरी नटराज, आकाश मणी आणि नीना व्यंकटेश यांच्यासोबत मिश्र ४x१०० मीटर फ्रीस्टाइल रिलेमध्ये ३:४१.०३ वेळ घेत सुवर्णपदक पटकावले.तिने एका दिवसात तीन सुवर्ण जिंकले. २०० मीटर फ्रीस्टाईल (२:०३.२४), १०० मीटर बटरफ्लाय (१:०३.६२), आणि महिला ४x१०० मीटर फ्रीस्टाईल रिले (४:०१.५८).तिने २०० मीटर फ्रीस्टाइलमध्ये स्वतःचा राष्ट्रीय विक्रमही पुन्हा मोडला. 

४x१०० मीटर फ्रीस्टाईल रिले संघात नीना व्यंकटेश,शालिनी आर दीक्षित आणि लतीशा मंदाना यांचा समावेश होता.शिरीन,शालिनी दीक्षित आणि मीनाक्षी मेनन यांच्यासमवेत ५० मीटर फ्रीस्टाईल (२६.९६) आणि महिलांच्या ४x२०० मीटर फ्रीस्टाईल रिले (८:५४.८७) मध्ये देसिंघूची सुवर्ण कामगिरी सुरूच राहिली.तिने ५० मीटर बटरफ्लायमध्ये रौप्य आणि ४x१०० मीटर मेडले रिलेमध्ये कांस्यपदक मिळवले.श्रीहरी नटराजनेही ९ सुवर्णांसह आपली राष्ट्रीय खेळ मोहीम पूर्ण केली परंतु त्याची पदक संख्या फक्त १० आहे तर धिनिधी देसिंघू ११ पदके आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *