
जळगाव : क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव, जिल्हा माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने बळवंत नागरी सहकारी पतपेढी व क्रीडा भारती जळगाव जिल्हा यांच्या सहकार्याने आणि जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली रथ सप्तमी व जागतिक सूर्यनमस्कार दिनाचे औचित्य साधत जिल्हा क्रीडा संकुलात शहरातील विविध विद्यालयाचे हजारो विद्यार्थ्यांनी सामुहिक सूर्यनमस्कार उपक्रमात सहभाग घेतला.

या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार, भाऊसाहेब राऊत, विद्यालयाचे मुख्याध्यापक एल एस तायडे, बळवंत नागरी सहकारी पतपेढीच्या उपाध्यक्ष सविता नाईक, संचालक संदीप लाड, अॅड प्रवीण झंवर व संजय कासार, मुख्याधिकारी जयदीप शहा, राज्य सॉफ्टबॉल असोसिएशनचे सचिव शिवछत्रपती पुरस्कार्थी डॉ प्रदीप तळवेलकर, आंतरराष्ट्रीय योग प्रशिक्षक डॉ अनिता पाटील, क्रीडा अधिकारी डॉ सुरेश थरकुडे, भारत देशमुख यांची उपस्थिती होती.
डॉ अनिता पाटील यांच्या टीमने सूर्यनमस्कारचे प्रात्यक्षिक सादर केले. विविध शाळांच्या हजारो विद्यार्थ्यांनी मंत्रोच्चारात सामूहिक सूर्यनमस्कार घातले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राजेश जाधव यांनी केले. राज्य क्रीडा मार्गदर्शक मीनल थोरात यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रीडा अधिकारी विशाल बोडके, अरुण श्रीखंडे, अनिल माकडे, जयांशु पोळ, जयंत जाधव, जयश्री माळी, नितीन पाटील, धीरज जावळे, आकाश सराफ, लिलाधर बाऊस्कर, सुनील बाविस्कर, विनोद कुलकर्णी, विनोद माने यांच्यासह उपस्थित शिक्षक बंधू भगिनी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.