द्वारकानाथ संझगिरींची रविवारी आदरांजली सभा

  • By admin
  • February 8, 2025
  • 0
  • 42 Views
Spread the love

मुंबई : क्रिकेटच्या निमित्ताने आपल्या मेंदूच्या आणि मनाच्या खिडक्या उघड्या ठेवून जग भ्रमंती करत आपल्या लेखणीच्या जोरावर वाचकांच्या मनात आढळ स्थान निर्माण करणाऱ्या जिंदादिल क्रीडा समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांच्या स्मृतींना आदरांजली वाहण्यासाठी रविवारी (९ फेब्रुवारी) सायंकाळी ५ वाजता दादरच्या सूर्यवंशी क्षत्रिय सभागृहात आदरांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही आदरांजली सभा सर्वांसाठी खुली ठेवण्यात आली आहे.

‘पप्पू’ या टोपण नावाने आपल्या मित्रांमध्ये चाहत्यांमध्ये प्रसिद्ध असलेल्या संझगिरींनी आपल्या पाच दशकांच्या लेखन प्रवासात हजारो लेख, शेकडो संगीताचे प्रयोग, शेकडो एक पात्री कार्यक्रम आणि ४० पुस्तकांचा खजिना आपल्या चाहत्यांना दिला. आपले सारे आयुष्य मनमुरादपणे जगलेल्या या अवलिया विषयी गेल्या दोन दिवसात  हजारो चाहत्यांनी, मित्रांनी सोशल मीडियावर भन्नाट आठवणी आणि किस्से व्यक्त केलेत. यावरून त्यांचे लेख प्रत्येकाच्या मनावर किती अधिराज्य गाजवत होते, याची कल्पना आलीच आहे.  तसे संझगिरी हे सर्वांचे लाडके होते. त्यामुळे त्यांना आदरांजली वाहण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी सर्वांनाच आमंत्रण दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *